गायिका कनिका कपूरची इमोशनल पोस्ट, ती म्हणते...

गायिका कनिका कपूरची इमोशनल पोस्ट, ती म्हणते...

लखनौ : बेबी डॉल, चिट्टीया कलाइया या सुपरहिट गाण्यांची सिंगर कनिका कपूर हिने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून कुटुंबियांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. 

लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या चाचणीचे तिन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे तिच्यावर लखनौमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कनिका लंडनमधून आल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्या सर्व नागरिकांचीही तपासणी करण्यात आली असून, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कनिकाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिताना म्हटले आहे, की कुटुंबियांची खूप आठवण येत आहे. लवकरात लवकर मला घरी जायचे आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये घड्याळ दाखविले असून, त्यात जीवन आपल्याला वेळेचा सदुपयोग करण्याचा धडा देत आहे. तर, वेळ आपल्याला आयुष्याची किंमत काय हे दाखवत आहे. मी सध्या आयसीयूमध्ये नसून, मी प्रकृती ठिक आहे. मला विश्वास आहे, की माझी पुढची टेस्ट निगेटिव्ह असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com