'शोले'चा 'सूरमा भोपाली' काळाच्या पडद्याआड!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 जुलै 2020

हम है बेमिसाल, अंदाज अपना अपना, शहेनशाह, मुस्कुराहट, सनम बेवफा, जमाई राजा, निगाहे, क्रोध, अभिमन्यू अशा जवळपास चारशे चित्रपटात त्यांनी काम केले.

मुंबई : 'शोले' या चित्रपटातील सूरमा भोपालीची व्यक्तिरेखा अजरामर करणारे विनोदी अभिनते जगदीप यांचे कर्करोगाच्या आजाराने अंधेरी येथील राहत्या घरी बुधवारी (ता.९) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे अभिनेते जावेद आणि नावेद हे दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.

अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!​

जगदीप यांचा जन्म 29 मार्च, 1939 दतिया, मध्य प्रदेशमध्ये झाला. त्यांचे वडील लाहोरला होते. फाळणीनंतर सर्व काही गेले त्यानंतर ते मुंबईला आले आणि बालकलाकार म्हणून काम करू लागले जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत.

Image may contain: 7 people, people sitting

जगदीप यांचे खरे नाव सय्यद जवाहर अली जाफरी आहे. जगदीप अभिनयास सुरुवात बालकलाकार म्हणून बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बालकलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली.

अद्भूत ! चक्क ११८ वर्षांनंतर ‘ही’ दुर्मिळ वनस्पती भारतात सापडली

Image may contain: 2 people, indoor

हम है बेमिसाल, अंदाज अपना अपना, शहेनशाह, मुस्कुराहट, सनम बेवफा, जमाई राजा, निगाहे, क्रोध, अभिमन्यू अशा जवळपास चारशे चित्रपटात त्यांनी काम केले. शोले चित्रपटातील सूरमा भोपाली हा त्यांचा गाजलेला चित्रपट. जगदीप यांनी गुरुदत्त, मेहबूब खान, विमल राय, रमेश सिप्पी अशा कित्येक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले.

Image may contain: 2 people

जगदीप यांनी खूप संघर्ष केला. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते स्वतःला सिद्ध करत राहिले. चित्रपट क्षेत्र असे आहे की तुम्हाला सतत स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. त्यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, तेव्हा ते संपूर्णपणे कोसळले होते. परंतु ते सावरले गेले. कारण त्यांची आई ही त्यांच्यासाठी सर्वस्व होती. शोले चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आणि सूरमा भोपाली ही भूमिका लोकप्रिय ठरल्यानंतर त्यांनी सूरमा भोपाली नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 

Image may contain: 3 people, people sitting

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywoods Legendary Comedian Jagdeep passes away at 81