'कुमारस्वामींच्या निवासस्थानी बाँब'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बंगळूर : जेपी नगर येथील मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी बाँब ठेवल्याचा फोन केलेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली. मन्सूर असे त्याचे नाव असून, तो मूळ कोप्पळचा रहिवासी असल्याचे समजते. 

मन्सूर गवंडी कामगार आहे. दीड वर्षापासून कडलू जवळील भाड्याच्या घरात तो राहतो. जनता दर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांची योग्य प्रकारे दखल घेतली नसल्याचा त्याचा आरोप आहे. रविवारी (ता. 16) रात्री दारू पिऊन त्याने 100 क्रमांकवर दूरध्वनी केला. जे. पी. नगर येथील मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी बॉंब ठेवल्याचे सांगून काही क्षणात त्याचा स्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. बाँब ठेवल्याचा फोन ऐकून पोलिसांत खळबळ सुरू झाली. लागलीच जे. पी. नगर पोलिस ठाण्यात याविषयी कळविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे विशेष सुरक्षा पथक, जे. पी. नगर पोलिस, श्‍वान पथक, बॉंब निष्क्रिय दल आदी शोध पथकांनी कसून तपास सुरू केला. परंतु मुख्यमंत्र्यांचे घर किंवा परिसरात कोणताच स्फोटक पदार्थ आढळून आला नाही. त्यामुळे फोन केलेल्याने खोटे सांगितल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: 'Bomb at kumaraswamy's residence'