
Gautam Navlakha Case : NIAच्या विशेष न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
मुंबई - भीमा कोरेगाव येथील आरोपी गौतम नवलखा प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या डोक्यावरून गेला आहे. गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र आदेश रहस्यमय दिला आहे.
न्यायालयाने म्हटलं की, विशेष न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करण्याचे कोणतेही कारण कुठेही देण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश विशेष न्यायालयाला दिले. हे काम चार आठवड्यांत पूर्ण करावे, असही सांगितलं. नवलखा सध्या वैद्यकीय कारणास्तव नजरकैदेत आहेत.
दरम्यान, यापूर्वीच्या निर्णयाने प्रभावित होण्याची गरज नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होऊ द्या. ट्रायल कोर्टाने UAPA च्या कलम 43D(5) वर आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या आदेशात न्यायालयाने याबाबत काहीही म्हटलं नव्हतं.