कर्नाटक सरकारची शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

"राज्याचा हा अर्थसंकल्प 6500 कोटींचा आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करुन देता येईल यावर निर्णय घेण्यात येणार आहे''.

- एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचा अर्थसंकल्प कुमारस्वामी यांनी सादर केला असून, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली.

2018-19 या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधान सौधा येथे सादर करण्यात आला. जेडीएस आणि काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात कुमारस्वामींनी विविध महत्वपूर्ण घोषणा केल्या. ते म्हणाले, की राज्याचा हा अर्थसंकल्प 6500 कोटींचा आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नव्याने खाते उघडण्यासही सांगण्यात येणार आहे. कर्जाची मर्यादा 2 लाखांपर्यंत ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या पीककर्ज योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार कोटींचा फायदा मिळणार आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुमारस्वामींनी शेतकऱयांना कर्जमाफी देण्याबाबत आश्वासने दिली होती. सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून 24 तासांत कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

Web Title: Bonanza for farmers HD Kumaraswamy announces Rs 34,000 crore mega farm waiver