सट्टेबाज ते फिक्सर : कोण आहे संजिव चावला?

वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

सामना निकालनिश्‍चिती (मॅचफिक्‍सिंग) प्रकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा सट्टेबाज आणि फिक्‍सर म्हणून सर्वप्रथम संजीव चावलाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. हॅन्सी क्रोनिए प्रकरणापासून कोण हा चावला, हा प्रश्‍न संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला पडला होता.

पुणे : सामना निकालनिश्‍चिती (मॅचफिक्‍सिंग) प्रकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा सट्टेबाज आणि फिक्‍सर म्हणून सर्वप्रथम संजीव चावलाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. हॅन्सी क्रोनिए प्रकरणापासून कोण हा चावला, हा प्रश्‍न संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला पडला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या राजधानीत राहणारा चावला सुरुवातीला स्थानिक सामन्यांत सट्टेबाजी करायचा. त्यातून त्याला फिक्‍सिंगचा मार्ग सापडला. त्यासाठी तो संघातील काही खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांतही सट्टेबाजी सुरू केली. सट्टेबाजी ते फिक्‍सिंग अशा प्रकारेही क्रिकेटला बदनाम करण्याचा चावला सूत्रधार होता.

केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

दिल्लीत व्यवसाय करणारा चावला १९९० मध्ये व्यावसायिक व्हिसाच्या आधारे लंडनमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर तो वरचे वर भारतात येऊन तो ‘उद्योग’ करत होता. भारत दौऱ्यावर २००० मध्ये आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएबरोबरचे मॅचफिक्‍सिंग करण्याबाबतचे त्याचे संभाषण दिल्ली पोलिसांनी टॅप केले. तेथून या प्रकरणाचा उलगडा झाला. तो कुख्यात दाऊदसाठीही काम करायचा, अशी माहिती त्या वेळी पुढे आली होती.

न्यायालयाच्या आवारातच बाँबस्फोट; तीन जखमी

क्रोनिएने दक्षिण आफ्रिकेतील चौकशीत संजीव चावलाचे नाव उघड केले आणि दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे चावलावर भारतीय दंडविधानाच्या ४२० (फसवणूक), १२० ब (कटकारस्थान) या कलमांखाली गुन्हे दाखल केले. क्रोनिएसह हर्शेल गिब्स, निकी बोए, पीटर स्टेड्रॉम हे दक्षिण आफ्रिकेचे इतर खेळाडूही सट्टेबाजी आणि फिक्‍सिंगमध्ये सहभागी होते. हॅन्सी क्रोनिएचे विमान दुर्घटनेत निधन झाले होते.

Image result for sanjeev chawla

ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये पाहा चक्क काय केले जातेय

फेब्रुवारी-मार्च २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आल्यानंतर क्रोनिएला पैसे देण्यात आले. या पैशाच्या मोबदल्यात चावलाने सामनानिश्‍चितीचा गेम खेळला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लगेचच सीबीआयने चौकशीही सुरू केली. त्यात माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन, अजय जडेजा, अजय शर्मा, मनोज प्रभाकर यांचीही नावे घेतली होती. तरीही, चावलावर आरोपपत्र दाखल होण्यासाठी २०१३ हे वर्ष उजाडले. चावलाला २००५ मध्ये इंग्लंडचा पासपोर्ट मिळाला. तेव्हापासून तो इंग्लंडच्या नागरिकत्वावर त्याच ठिकाणी वास्तव्यास होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bookie to Fixer Who is Sanjeev Chawla