ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा

अशोक गव्हाणे | Sunday, 12 July 2020

आधी होते तसे नेहमीचे जीवन जगायला सुरुवात करा, पुन्हा एकदा कामाला लागा, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देशवासीयांना करत आहेत. कोरोना टाळेबंदीतून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न ब्रिटनचे सरकार करीत आहे, त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी हे आवाहन लोकांना केले आहे.

लंडन : आधी होते तसे नेहमीचे जीवन जगायला सुरुवात करा, पुन्हा एकदा कामाला लागा, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देशवासीयांना करत आहेत. कोरोना टाळेबंदीतून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न ब्रिटनचे सरकार करीत आहे, त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी हे आवाहन लोकांना केले आहे. लोकांचे पंतप्रधानांना प्रश्न या समाजमाध्यमांवरील उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना जॉन्सन बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना टाळण्यासाठीच्या व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखणे आदी उपाययोजनांचे पालन करण्याचे स्मरण करून देत त्यांनी हे आवाहन केले. बोरिस जॉन्सन यावेळी म्हणाले की, आता लोकांनी सावधपणे पुन्हा आपल्या कामावर परतणे योग्य ठरणार आहे. जर तुमची कंपनी कोरोना टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत असेल, तेथे सुरक्षितता असेल, तर तुम्ही पुन्हा कामावर जायला सुरुवात करायला हवी असेही त्यांनी सांगितले आहे.

अधिकाधिक लोकांना निर्धास्तपणे बाजारात, उपाहारगृहांमध्ये जावेसे वाटले पाहिजे, आणि आता जास्तीत जास्त लोकांनी निर्धास्तपणे बाजारात जायला हवे आणि खरेदीही करायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. बोरिस यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी लोकांना घराबाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते, असे बोरिस जॉन्सन म्हणाले आहेत.