कोविंद यांना अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांचा पाठिंबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी माझ्याशी पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली. त्यांची विनंती मी मान्य केली असून, कोविंद यांना आमचा पाठिंबा असणार आहे. 

चेन्नई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना अण्णा द्रमुकमधील दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे.

कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. बिहारमधील सत्ताधारी जदयूनेही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा द्रमुकमधील मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या गटाने यापूर्वीच कोविंद यांना पाठिंबा दिला होता. आता ओ. पनीरसेल्वम यांच्या गटानेही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दलित व्यक्ती म्हणून कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केले होते. कोविंद यांना एनडीएतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. कोविंद यांची निवड जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.

पनीरसेल्वम म्हणाले, की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी माझ्याशी पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली. त्यांची विनंती मी मान्य केली असून, कोविंद यांना आमचा पाठिंबा असणार आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
कल्याण: विमानतळाचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांवर पोलिसांचा गोळीबार

बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​
जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा

Web Title: Both factions of AIADMK back NDA presidential nominee Ram Nath Kovind