Video : लपाछपी खेळताना कंटेनरमध्ये लपला अन् थेट मलेशियात पोहोचला; काय आहे नेमकं प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video : लपाछपी खेळताना कंटेनरमध्ये घुसला अन् थेट मलेशियात पोहोचला; काय आहे नेमकं प्रकरण?

ढाका : लपाछपी खेळताना एक मुलगा बांग्लादेश येथून थेट मलेशियात पोहोचल्याची घटना घडली आहे. हा मुलगा तब्बल ६ दिवस उपाशी राहिला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ११ जानेवारी रोजी तो बेपत्ता झाला होता.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

अधिक माहितीनुसार, बांग्लादेश येथील चिट्टागोंग पोर्टवर हा प्रकार घडला आहे. या पोर्टवर लहान मुले लपाछपी खेळत होते. तर लपाछपी खेळत असताना फहीम नावाचा मुलगा एका कंटेनरमध्ये घुसला आणि तिथे लपून बसला. त्यानंतर त्याने कंटेनरचं दार आतून लावून घेतलं. आतमध्ये त्याला काही वेळानंतर झोप लागली आणि तो तसाच झोपी गेला. त्यानंतर या कंटेनरमध्ये माल भरला गेला आणि ते निर्यात करण्यासाठी मालवाहू जहाजामध्ये ठेवण्यात आलं.

विशेष म्हणजे कंटेनरमध्ये माल भरत असताना त्यामध्ये एक लहान मुलगा आहे याची कुणाला जाणीव झाली नाही. ज्यावेळी हे मालवाहू जहाज मलेशियात पोहोचले त्यावेळी या कंटेनरमध्ये मुलगा असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला बाहेर काढण्यात आलं. तो तब्बल ६ दिवस उपाशी असल्याने त्याला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :missing caseviral video