बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला गोबरगॅसच्या खड्ड्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

गेले पाच दिवस त्याचा शोध सुरू होता. गुरूवारी पोटे मळ्यातील विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला होता. पण तो न सापडल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची नोंद शहापूर पोलीसानी केली होती. पण शनिवारी त्याचा मृतदेह सापडला.

बेळगाव : येथील मलप्रभानगर मधून 29 मेपासून बेपत्ता असलेल्या गणेश होसमनी या मुलाचा मृतदेह शनिवारी पोटे मळा येथील गोबरगॅसच्या खड्ड्यात सापडला. 

गेले पाच दिवस त्याचा शोध सुरू होता. गुरूवारी पोटे मळ्यातील विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला होता. पण तो न सापडल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची नोंद शहापूर पोलीसानी केली होती. पण शनिवारी त्याचा मृतदेह सापडला.

Web Title: Boy Missing body found in Gobargas pothole