#BoycottChineseProducts ट्विटरवर ट्रेंड

#BoycottChineseProducts ट्विटरवर ट्रेंड

नवी दिल्ली -  पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अजहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा तांत्रिक स्थगिती मिळविली आहे. यामुळे आता #BoycottChineseProducts आणि #BoycottChina हा ट्रेंड ट्विटरवर आला आहे.

ट्विटवर भारतीयांनी #BoycottChina आणि #BoycottChineseProducts या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून चीनी उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. #ChinaBacksTerror हा हॅशटॅग वापरून चीन दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने चीनी उत्पादने वापरणे भारताने बंद करावे असे नेटिझन्सचे म्हणणे आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या चीनकडे नकाराधिकार आहे. याआधीही भारताप्रमाणेच अन्य देशांनी अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे, म्हणून सादर करण्यात आलेला प्रस्ताव चीननेच तीन वेळा रोखून धरला होता. अजहरबाबत चीनने पुन्हा एकदा मवाळ भूमिका घेतली आहे. या संदर्भात चर्चा करताना सर्व निर्धारित नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. तसेच सर्वांना मान्य असा तोडगा यावर काढला जायला हवा, असा अजब दावा चीनने केला. 

चीनने अजहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर 2009, 2016, 2017 असा तीनदा नकाराधिकार वापरला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचा निर्णय निराशाजनक असल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com