Boycott Kapil Sharma : बहिष्कारावर कपिल शर्माचे उत्तर (व्हिडीओ)

Boycott Kapil Sharma is trending on twitter
Boycott Kapil Sharma is trending on twitter

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक नेते, सेलिब्रिटी यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया विविध माध्यमातून मांडल्यात. मात्र काही जणांना लोकांकडून देशद्रोही, गद्दार किंवा निष्ठूर अशाप्रकारच्या उपासनांचा सामनाही करावा लागला. यात पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिध्दू आणि कपिल शर्मा यांचेही नाव सामिल आहे.

नवज्योत सिंग सिध्दू यांनी पाकिस्तानात जाऊन पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट घेतली होती, यावरुन आधीच भारतात काहींनी राग व्यक्त केला. त्यानंतर आता पुलवामा हल्ला प्रकरणीही त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा सहभाग असलेला शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' मधून त्यांना बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला. आता शो होस्ट कपिल शर्मा वरही नेटकऱ्यांनी टिकेची तोफ डागळली आहे. हल्ल्याप्रकरणी कपिल शर्मा यांनीही सिध्दू यांच्या वक्तव्याला योग्य सांगत दोन देशांमधील तणाव युध्दाने नव्हे तर शांततेने आणि बोलून मिटेल, असे म्हटले आहे. मात्र, नेटकऱ्यांना हे फारसे रुचलेले दिसले नाही. म्हणून सध्या ट्विटरवर #BoycottKapilSharma हा हॅशटॅग व्हायरल झाला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com