मध्यरात्री प्रेयसीच्या खोलीत घुसला अन् आवाज झाला...

boyfriend reached girlfriend house at mid night at up
boyfriend reached girlfriend house at mid night at up

मुरादाबाद (उत्तर प्रदेश): प्रियकर मध्यरात्री हळूच प्रेयसीच्या खोलीत गेला. दोघे चर्चा करत असताना मध्येच भांडे पडून आवाज झाल्यामुळे घरातील सदस्य उठले आणि प्रियकराला अक्षरशः धुतले. प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसबा अगवानपुर भागामध्ये राहात असलेल्या प्रेयसीने रात्री दोनच्या सुमारास पंकज या प्रियकराला फोनवरून घरी बोलावले. यावेळी घरामधील सर्वजण झोपले होते. पंकजने हळूच घरामध्ये प्रवेश केला आणि प्रेयसीच्या खोलीत गेला. अंधारात खोलीमधील भांडे जोरात जमिनीवर आदळले. यामुळे घरातील सदस्य जागे झाले आणि युवकाकडे लक्ष गेले. घरातील सदस्यांनी जोरजोरात ओरडायला सुरवात केली. यामुळे परिसरातील अनेकजण जागे झाले. कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी पंकजला पकडून बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
बेशुद्ध पडलेल्या पंकजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पंकजवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com