वर्गात मुले-मुली एकत्र नको; वेल्लापल्ली नटेसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boys and girls should not together in class Vellapalli Natesan kochi

वर्गात मुले-मुली एकत्र नको; वेल्लापल्ली नटेसन

कोची : मुलगा आणि मुलगी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते, असे वादग्रस्त विधान केरळमधील इजवा समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री नारायण धर्म परिपलन योगम या संघटनेचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन यांनी केले आहे. ते मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे निकटवर्तीय मानले जातात. केरळच्या ‘एलडीएफ’ सकारच्या लिंग समानता शैक्षणिक धोरणावर बोलताना ते म्हणाले, की आमची संघटना शालेय वर्गात मुला-मुलींना एकत्र बसण्याच्या बाजूने नाही. आपली स्वत:ची संस्कृती आहे. आपण अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये राहत नाही.

आपली संस्कृती ही मुला-मुलींना एकमेकांची गळाभेट घेऊ देण्यास किंवा एकत्र बसण्यास परवानगी देत नाही. आपण अन्य धर्मियांच्या शैक्षणिक संस्थांत असे प्रकार पाहिले नसतील. १८ पेक्षा कमी वयोगटातील मुले-मुली आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र बसायला नको. कारण ते अजूनही विद्यार्थी आहेत. जेव्हा मुलं मोठी होतात, तेव्हा ते परिपक्व होतात. एलडीएफ सरकार हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगूनही धार्मिक दबावाला बळी पडत आहे. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नाही. त्यामुळे चुकीचे संदेश जात आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Boys And Girls Should Not Together In Class Vellapalli Natesan Kochi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..