...अन् त्याचा हात अडकला दीड तास कमोडमध्ये

A boys hand got stuck in commode fro 1 and half hour in Tamilnadu
A boys hand got stuck in commode fro 1 and half hour in Tamilnadu

चेन्नईः एका युवकाचा हात कमोडमध्ये अडकला होता. तब्बल दीड तासानंतर ड्रिल मशीन आल्यावर हात अलगत बाहेर काढण्यात आला आणि युवकाची सुटका झाली. परिसरात युवकाच्या हाताची चर्चा रंगली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मणिमरन (वय 29, रा. तंजावूर) असे हात अडकलेल्या युवकाचे नाव आहे. मणिमरन हा मोटारीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पट्रोलपंपावर गेला होता. पेट्रोल भरल्यानंतर तो शौचलयाला गेला. यावेळी त्याच्या मोटारीची चावी कमोडमध्ये पडली. चावी बाहेर काढण्यासाठी त्याने कमोडमध्ये हात घातला. पण, त्याचा हात अडकला. हात बाहेर येत नसल्यामुळे तो ओरडू लागला. परंतु, त्याचा आवाज कर्मचाऱयांपर्यंत गेला नाही. काही वेळानंतर एका कर्मचाऱयाने आवाज ऐकला आणि हात अडकल्याचे समजले.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयाने पोलिस व बचाव पथकाला माहिती दिली. बचाव पथक ड्रिल मशिन घेऊन आल्यानंतर दरवाजा तोडून कमोडला छिद्र पाडले. तब्बल दीड तासानंतर युवकाचा हात बाहेर काढण्यात आला. सुदैवाने त्याच्या हाताला जखम झाली नाही. शिवाय, कमोडमधून चावी बरोबरच एक मोबाईलसुद्धा बाहेर काढण्या आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com