"ब्राह्मोस'ने घेतला लक्ष्याचा अचूक वेध

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

तीन महिन्यांपूर्वी सुखोई एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या "ब्राह्मोस'चा पल्ला चारशे किलोमीटर आहे

नवी दिल्ली/पोखरण  - भारताने आज (गुरुवार) ब्राह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला, अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

तीन महिन्यांपूर्वी सुखोई एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या "ब्राह्मोस'चा पल्ला चारशे किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने "संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'चे अभिनंदन केले आहे.

Web Title: brahmos successfully test fired