#BrahmosLeak निशांत अगरवाल 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता.

नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता.

संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील "एनपीओ मशिनोस्त्रोयेनिया' यांनी एकत्र येऊन "ब्राह्मोस एरोस्पेस सेंटर' विकसित केले आहे. भारत आणि रशिया यांच्यात 12 फेब्रुवारी 1998मध्ये झालेल्या करारानुसार ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. निशांत मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे आणि गेल्या चार वर्षांपासून तो येथे कार्यरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुकवर महिलांच्या नावाने खोटे खाते तयार करून त्या "हनी ट्रॅप'मध्ये भारतातील संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्यांना ओढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईत अशा प्रकारचे दोन फेसबुक "आयडी' उजेडात आले होते. ही दोन्ही खाती पाकिस्तानातून चालविली जात होती. या खात्यांवर निशांत अग्रवालने चॅटिंग केल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेश "एटीएस'ने सोमवारी (ता. 8) सकाळी निशांतच्या निवासस्थानी छापा घातला त्या वेळी त्याच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये अतिसंवेदनशील माहिती साठविल्याचे आढळले. सरकारी गोपनीयतेच्या कायद्यानुसार ही माहिती त्याच्या वैयक्तिक संगणकात असणे अपेक्षित नव्हते. गोपनीयतेच्या कायद्याच्या भंगाबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

27 वर्षांचा निशांत अग्रवालची कॉलेजपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. पण गेल्या 2 वर्षांपासून तो फेसबुकवरुन पाकिस्तानातल्या दोन महिलांच्या अकाऊंटवर चॅट करत होता. याच चॅटींगमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गेल्या महिन्यात पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या नोएडामधून एका सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अच्युतानंदन मिश्रा या जवानाला अशाच पद्धतीने गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक केली होती. ही केसही हनीट्रॅपचीच होती. मिश्राची चौकशी करत असतानाच या दोन पाकिस्तानी अकाऊंटची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या अकाऊंटवर भारतातून कोण कोण चॅट करतेय यावर पाळत ठेवायला सुरुवात केली अन् निशांत अग्रवाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तो ज्या बनावट महिलांच्या अकाऊंटवर चॅट करत होता, ते अकाऊंट पाकिस्तानातून हाताळले जात असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. या फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात अजूनही दोन भारतीय सुरक्षा अधिकारी असल्याचा संशय आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आएसआयचं हे जाळं अजून किती लोकांपर्यंत पसरलंय हे लवकरच कळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोण आहे निशांत अग्रवाल?
- निशांत अग्रवाल हा मूळचा उत्तराखंडच्या रुरकीचा आहे.
- निशांत मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
- डोंगरगाव येथील "डीआरडीओ'च्या प्रकल्पात तो कार्यरत आहे
- नागपूरच्या उज्ज्वल नगर परिसरातील मनोहर काळे यांच्या घरात निशांत गेल्या चार वर्षांपासून राहत आहे.
- या वर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला.

ब्राह्मोसची वैशिष्ट्ये
- "ब्राह्मोस' हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले क्षेपणास्त्र आहे.
- कमी अंतरापर्यंत वार करणारे हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते.
- हवेतच मार्ग बदलण्याची क्षमता.
- अवघ्या 10 मीटरच्या उंचीवरून उडण्याची क्षमता.
- "ब्राह्मोस' क्षेपणास्त्र अमेरिकी टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या दुप्पट वेगाने वार करते.

Web Title: BrahmosLeak how ats reach arrest nishant agarwal