आईचा आत्मविश्वासच ठरला जीवनदायी; ब्रेनडेड झालेला मुलगा शुद्धीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

- ब्रेनडेड झाले होते

- मुलगा होता बेशुद्धावस्थेत.

हैदराबाद : डॉक्टरांनी एका रुग्णाचे ब्रेनडेड झाल्याचे सांगितले होते. हे ऐकून त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. ब्रेनडेड झाल्यामुळे संबंधित मुलगा बेशुद्धावस्थेत होता. मात्र, त्याच्या आईच्या दृढ विश्वासामुळे तो पुन्हा शुद्धीवर आला. ही घटना तेलंगणामध्ये घडली. 

गंधम किरण असे अठरा वर्षीय मुलाचे नाव आहे. किरण हा डेंग्यू, कावीळ आणि हेपेटाईटिस बी या आजाराने ग्रस्त होता. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पण तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणा झालेली नाही. त्यानंतर 3 जुलैला डॉक्टरांनी किरणचे ब्रेनडेड असल्याचे जाहीर केले.

किरणला सपोर्ट् सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मुलाला ब्रेनडेड झाल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आपला मुलगा लवकर बरा होईल, अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. मात्र, आईच्या विश्वासाने किरणची प्रकृती सध्या ठिक असून, तो शुद्धीवर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Brain Dead Boy gets conscious because of Mothers Hope