ब्रेकफास्ट अपडेटः महाराष्ट्रात Bird Fluचा शिरकाव ते शिकागोत सिरियल किलिंगचा थरार, ठळक बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

मुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू  'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

खळबळजनक ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच
मुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू  'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. - सविस्तर वाचा

शिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी
शिकागो शहरात एक धक्कादायक अशी सिरीयल किलींगची घटना घडली आहे. एका सनकी व्यक्तीने शहरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. या इसमाने अंधाधुंद असा गोळीबार करत शिकागो शहरातील निष्पाप तीन लोकांचा बळी घेतला आहे. - सविस्तर वाचा

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेची फिल्डिंग, अब्रुनुकसानीचा फास्ट ट्रॅक न्यायालतात दावा ?
भाजपनेते किरीट सोमय्या सोमैया यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. किरीट सोमय्या शांत होणार नाहीत हे गृहीत धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे. - सविस्तर वाचा

संसद पाडा अन्..., मुनव्वर राणांच्या टि्वटमुळे नवा वाद
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. आपली शायरी आणि वक्तव्यासाठी चर्चेत असणारे राणा यांनी एक ट्विट केलंय, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. - सविस्तर वाचा

'तरुणांनी धरावी नथुरामची वाट'; हिंदू महासभेने सुरु केलं 'गोडसे स्टडी सर्कल'
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अशा महात्म्याचा नथुराम गोडसेने (Nathuram Godse) गोळ्या घालून हत्त्या केली होती. - सविस्तर वाचा

पालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का? मग ही बातमी वाचाच
'शाळेत यायचे असेल, तर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करा', असे तुम्हाला (पालकांना) शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांगण्यात येत असेल, तर जरा थांबा आणि इकडे लक्ष द्या! - सविस्तर वाचा

टस्कर हत्तीच्या चित्काराने शेतकऱ्याची घाबरगुंडी
चंदगडच्या सीमेवर वावरत असलेला टस्कर हत्ती पुन्हा आजरा तालुक्‍यात परतला आहे. टस्कराने एंरडोळ येथील शेतकरी शंकर आप्पा पाटील यांच्या शेतातील ऊस व केळी पिकाचे नुकसान केले आहे. - सविस्तर वाचा

द्राक्षपंढरीवर कोसळली ‘संक्रांत’ ; द्राक्षमणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात
नाशिक जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षपंढरीवर ‘संक्रांत’ कोसळली आहे. दिंडोरी भागात झालेल्या पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले असून, पाण्यामुळे मणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात सापडल्या आहेत. - सविस्तर वाचा

वीस लाखांसाठी ‘दहशतवाद्यां’ना मारले
काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या तथाकथित बनावट चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या एका कॅप्टनने वीस लाखांचे इनाम जिंकण्यासाठी दोन स्थानिक नागरिकांशी संगनमत करून तीन युवकांना ठार मारल्याचे पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. - सविस्तर वाचा

दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिला दिलासा
सोने हे नेहमीच गुतवणूकदारांसाठी आकर्षक ऑप्शन राहिलेला आहे. अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना अलंकार आभूषणांची खरेदी करत असतात. त्यामुळे दागदागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. - सविस्तर वाचा

पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी 
पुणे- मुंबई एक्सप्रेस वे-वर कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. तर काही अंतरावर आयशर उलटला आहे. - सविस्तर वाचा
 

वाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू
पुणे- मुंबई एक्सप्रेस वे-वर कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. - सविस्तर वाचा
 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast updates top 10 news bird flu in parbhani nathuram godase chicago serial killer munawwar rana kolhapur tusker elephant