विवाहानंतर सासरी जाताना नवरीला उलटी आली अन्...

वृत्तसंस्था
Wednesday, 17 June 2020

विवाह झाल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. प्रवासादरम्यान नवरीला एका नदीच्या पुलावर उलटी आली. मोटार थांबल्यानंतर तिने तत्काळ पुलावरून पाण्यात उडी मारली. विवाहानंतर काही तासातच नवरीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सवाई माधोपूर (राजस्थान): विवाह झाल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. प्रवासादरम्यान नवरीला एका नदीच्या पुलावर उलटी आली. मोटार थांबल्यानंतर तिने तत्काळ पुलावरून पाण्यात उडी मारली. विवाहानंतर काही तासातच नवरीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सुशांतच्या वहिनीनेही सोडला प्राण...

राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या पाली नावाच्या पुलावर ही घटना घडली. नवरीने सासरी जाताना चंबळ नदीत उडी मारली. तब्बल 33 तासानंतर तिचा मृतदेह सापडला. विवाहात आनंदी असणाऱया नवरीने आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.

 गांव अल्लापुर की रहने वाली थी दुल्हन

अल्लापूर येथील अंजूचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. विवाहात अंजू मोठ्या आनंदात होती. नातेवाईकांबरोबर छायाचित्रे काढून घेतली. विवाह झाल्यानंतर अंजू सासरी निघाली होती. मोटारीमध्ये नवरदेवासोबत ती बसली होती. प्रवासादरम्यान तिने उलटी आल्याचे सांगितले. पण, अंधार असल्यामुळे चालकाने काच खाली करून उलटी करण्यास सांगितले. पुढे काही अंतर गेल्यावर चंबळ नदीवरील पुलावर मोटार आली. यावेळी अंजूने परत उलटी आल्याचे सांगून मोटार थांबवायला लावली. मोटारीमधून उतरल्यानंतर तिने तत्काळ पुलावरून पाण्यात उडी मारली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वजण घाबरले. अंधारात खाली पाहिल्यानंतर काही वेळ अंजू पाण्यात दिसली. पण, नंतर दिसली नाही. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अंजूचा पाण्यात शोध सुरू होता. 33 तासानंतर तिचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 उल्टी करने के बहाने रुकवाई कार

नातेवाईकांनी सांगितले की, 'सतत हसमुख असणाऱया अंजूने अचानक असे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न पडला आहे. विवाहादरम्यान दिवसभर हसत होती. पण, सासरी जाण्यापूर्वीच ती जगातून निघून गेली.'

पाक पोलिसांनी घाणेरडे पाणी पाजले; रॉडने मारले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride committed suicide in sawai madhopur at rajasthan