विवाहानंतर तासातच प्रियकरासोबत नवरी पळाली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

विवाहानंतर आपल्या सासरी जात असताना नवरीच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भरवरातीतून नवरीला पळवले.

रांची (झारखंड): विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वधू-वराकडील नातेवाईक एकमेकांची आदराने चौकशी करत होते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर एक तासातच नवरी प्रियकरासोबत सर्वांसमोर पळून गेल्याची घटना येथे घडली आहे.

एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे धुर्वा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे. विवाहानंतर एक तासातच नवरी प्रियकराच्या दुचाकीवर बसून सर्वांच्या समोर पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. एका जोडप्याचा मोठ्या धामधुमीत विवाह सोहळा पार पडला. विवाहानंतर नवरीची पाठवणी करण्यात आली. परंतु, विवाहानंतर आपल्या सासरी जात असताना नवरीच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भरवरातीतून नवरीला पळवले. यावेळी नवरामुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाणही करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार नवरीच्या सहमतीने केला असल्याचे समोर आले आहे. नवरामुलगा खूंटीमधील तर मुलगी नगडी येथील रहिवासी आहेत.

मोटारीत असणाऱ्या नवऱ्याने सांगितले, 'विवाहानंतर पाठवणीचा कार्यक्रम झाला होता. गाडीतून खूंटी येथे निघालो होतो. त्यावेळी धुर्वा भागात नवरीच्या प्रियकराने गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या नवरीने बाहेरुन एक आवाज आल्यावर स्वत:च मोटारीचा दरवाजा उघडला प्रियकराच्या दुचाकीवर जाऊन बसली. आम्हाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार सुरू असताना नवरी प्रियकराच्या दुचाकीवर बसून पळून गेली. मुलाकडील कुटुंबियांनी याबाबत धुर्वा पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. दरम्यान, काही वेळानंतर प्रियकरासोबत पळून गेलेल्या नवरी आणि तिच्या प्रियकराने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असून, संरक्षणाची मागणी केली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride elopes with lover reaches police station at ranchi