विवाह लावणाऱया भटजीसोबत नवरीने काढला पळ...

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

विवाहात ज्या भटजीने दोघांचा विवाह लावून दिला त्याच्याबरोबच युवती पळून गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) : विवाह लावणाऱया भटजीसोबत 15 दिवसांत नवविवाहित युवतीने पळ काढल्याचा प्रकार सिरोंजमध्ये घडला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका युवकासोबत विवाह झाला होता. या दोघांचे विवाह विनोद नावाच्या एका भटजीने लावला होता. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर काही दिवसांसाठी नवविवाहित माहेरी राहण्यासाठी आली होती. दरम्यानच्या काळात 23 मे रोजी सिरोंजमध्ये एक विवाहसोहळा होणार होता. हा विवाहासाठी भटजी म्हणून विनोदला हजर राहणार होता. मात्र, विवाहाचा विधी सुरु होण्यापूर्वी विनोद मधूनच गायब झाला. यामुळे सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पण, विनोदचा काही शोध लागला नाही. दुसरीकडे माहेरी आलेली नवविवाहिताही बेपत्ता असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. यामुळे नवविवाहीतेच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान नवविवाहित आणि भटजी विनोद पळून गेल्याचे समजले. पुढील तपासादरम्यान या दोघांचे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली.

पोलिस विनोदच्या घरी गेल्यानंतर त्याचा पूर्वीच विवाह झाला असून, त्याला दोन मुले असल्याचे समजले. पोलिसांनी नवविवाहितेच्या नातेवाईकांची चौकशी केली. तिने पळून जाताना आपल्यासोबत दीड लाख रुपयाचे दागिने आणि 30 हजाराची रोख रक्कम घेऊन गेल्याचे समजले. भटजी विनोद व नवविवाहित युवती बेपत्ता असून, पोलिस दोघांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे ज्या भटजीने दोघांचा विवाह लावून दिला त्याच्याबरोबच युवती पळून गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride escaped with the same priest who had done her wedding rituals at madhya pradesh