
मांडवातली लाईट गेली आणि भर लग्नात नवरा-नवरीच बदलले!
मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये दोन बहिणींचं लग्न सुरू होतं. या लग्नातच लाईट गेली आणि जे काही घडलं ते अगदी एखाद्या मालिकेच्या कथानकाला शोभेल असंच होतं. लाईट गेल्यामुळे भर मांडवात नवरा-नवरींचीच अदलाबदल झाली. दोन्ही बहिणींनी वेगळ्याच नवरदेवांसोबत लग्नगाठ बांधली.
हेही वाचा: Video: रस्त्यावरच केले वार, मुस्लीम मुलीशी लग्न करणं हिंदू मुलाला पडलं महागात
रविवारी रमेशलाल यांच्या दोन मुली, निकिता आणि करिश्मा यांचं भोला आणि गणेश या दोन तरुणांशी लग्न होत होतं. दोघींनीही एकसारखे कपडे घातले होते आणि डोक्यावर पदरही घेतला होता. त्यामुळे लग्नाच्या वेळी झालेल्या या अदलाबदलीबद्दल कोणाला कळलंही नाही.
हेही वाचा: लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार
पंडितांनीही दोन्ही नवरदेवांना या बदललेल्या वधूंसोबत सप्तपदी घेण्यास सांगितलं. जेव्हा हे दोन्ही नवरदेव आपापल्या वधूंना घेऊन घरी परतले, त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. दीर्घकाळ वादविवाद झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मध्यम मार्ग काढला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा या वधूवरांना सगळे विधी करावे लागले.
Web Title: Brides And Grooms Exchanged In Marriage Ceremony In Ujjain Madhyapradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..