जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटनने माफी मागावी- लंडनचे महापौर

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

अमृतसर - लंडनचे पहिले मुस्लिम महापौर सादिक खान हे सहा दिवसांच्या भारत आणि पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. काल (बुधवार) सादिक खान हे अमृतसरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली. जालियनवाला बागेबाहेर माध्यमांशी बोलतानाही खान यांनी, येथे झालेले हत्याकांड ही सर्वात भयावह घटना असून, या हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

जालियनवाला बागेत हिंदू, मुस्लीम व शीख बांधव शांततेत इंग्रजांविरोधात आंदोलन करत होते, पण डायर यांनी या निष्पापांवर गोळीबाराचे आदेश दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सादिक खान 2016मध्ये लंडनच्या महापौरपदी निवडून आले आहेत. खान हे मूळचे पाकिस्तानचे असून, त्यांचे वडील हे बस चालक होते. 

13 एप्रिल 1919मध्ये ब्रिटिश जनरल रेनिवाल्ड डायर याने जालियनवाला बागेमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. गोळीबारापासून वाचण्यासाठी शेकडो लोकांनी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या होत्या.

Web Title: British government should apologise for Jallianwala tragedy, says London Mayor