आनंदकुमार मायावतींचा वारसदार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचा लहान भाऊ आनंदकुमार यांना आज पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय घेतला. मायावती यांच्या अनुपस्थितीमध्ये आनंदकुमार हेच आता सर्व महत्त्वाचे निर्णय घेतील. येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 

मायावती म्हणाल्या, ''केंद्रातील भाजप सरकार हे जाणीवपूर्वक आनंदकुमार यांना लक्ष्य करत आहे, प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्येही त्यांनी संघर्षातून माघार घेतली नाही. माझा बराच वेळ लखनौमध्ये जातो त्यामुळे दिल्लीतील कामे तशीच अर्धवट राहतात. ती कामे पूर्ण व्हावीत म्हणून मी कोणतेही राजकीय पद न भूषविलेल्या आनंदकुमारला उपाध्यक्षपदी नेमते आहे. पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या आजारपणाच्या काळामध्ये माझ्या भावाच्या कुटुंबाने त्यांची काळजीपूर्वक देखभाल केली होती. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राला विरोध केल्याने मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.

लोकशाही वाचविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या लढ्यामध्ये आपण भाजप विरोधात कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करू शकतो. मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये फेरफार करून भाजपने विजय मिळवला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्येही हाच कित्ता गिरवण्यात आला. या विरोधात आमचा पक्ष प्रत्येक महिन्याच्या अकरा तारखेला आंदोलन करणार होता; पण सध्या हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन असल्याने आम्ही या आंदोलनास स्थगिती दिली आहे.'' 

भावालाच उपाध्यक्ष करून मायावती यांनी आपल्या पक्षामध्ये घराणेशाही आणली असून, या निर्णयामुळे त्यांचे राजकीय करिअरच संपुष्टात येईल. कधीकाळी त्यांनीच आपण घराणेशाहीच्या विरोधात असल्याचा दावा केला होता. 
- विजयबहाद्दूर पाठक, भाजपचे सरचिटणीस 

Web Title: Brother Anand Kumar will be successor of BSP Chief Mayawati