हसीन जहाँ येताच सासू व दिर गेले पळून...

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

कुलूप लावलेले बंद घर दिसताच हसीन भडकली. तिने तेथील स्थानिक पोलिसांवर शमीच्या घरच्यांना पूर्व सूचना देऊन पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे.

लखनौ : महंमद शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ हे गेले काही दिवस वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आहेत. शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतके आरोप करूनही आता या वादावर पडदा पडण्याची चिन्हं आहेत. हसीन सगळे वाद मिटवून सासरी म्हणजेच उत्तर प्रदेशातील सहसपूरला गेली. पण या वादावर पडदा पडण्याऐवजी तो आता वाढला आहे. ती घरी येणार हे ऐकताच तिची सासू म्हणजे शमीची आई व दिर म्हणजे शमीचा भाऊ हे घराला कुलूप लावून पळून गेले आहेत. 

 haseen jaha

कुलूप लावलेले बंद घर दिसताच हसीन भडकली. तिने तेथील स्थानिक पोलिसांवर शमीच्या घरच्यांना पूर्व सूचना देऊन पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. ती तिची मुलगी व वकिलांसोबत पोलिस ठाण्यात गेली. तसेच पोलिसांना सुरक्षाही मागितली. या प्रकारानंतर ती दिवसभर सहसपूर भागात राहिली. 

मागच्या काही दिवसात हसीनने शमीवर अनेक आरोप केले होते. त्याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. मॅच फिक्सिंगमध्ये तो सहभागी आहे, तसेच तो घरी मारहाण करतो, असे अनेक आरोप तिने शमीवर लावले. शमीच्या भावाने तिचा विनयभंग केल्याचाही आरोप तिने केला होता. 

Web Title: brother in law anf mother in law leaves home because of hassen jahan