अश्रू आणले! मंत्र्यावरील कारवाईनंतर केजरीवालांकडून मान यांचे कौतुक

कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा आरोप मंत्री सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Punjab CM Bhagwant Mann
Punjab CM Bhagwant Mannesakal

नवी दिल्ली : पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित मंत्र्याची तडकाफडकी मंत्रीमंडळातून हाकालपट्टी केली आहे. त्यांच्या या कारवाईची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. दरम्यान, मान यांच्या या धडाकेबाज कारवाईची आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीदेखील ट्वीट करत पाठ थोपटली आहे. कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा आरोप मंत्री सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भगवंत मान यांच्या कृतीने “माझ्या डोळ्यात अश्रू आले”, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हणत संपूर्ण देशाला आज आपचा अभिमान वाटतो, असे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे. तसेच "आम्ही जे केले आहे त्यासाठी खूप धैर्याची गरज आहे. भारतातील राजकारण खूप मागे गेले आहे पण आम आदमी पार्टी ही एक नवीन सुरुवात असल्याचे म्हणत गर्दन कट जायेगी लेकीन गद्दारी नाई करेंगे असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.

“आम आदमी पार्टीचा जन्म प्रामाणिक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी झाला असून, भ्रष्टाचार आमचाच असला तरी तो खपवून घेणार नसल्याचे यापूर्वी अनेकदा केजरीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, मान यांच्या कारवाईनंतर आपच्या अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मान यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून, “आम आदमी पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे ज्याकडे भ्रष्टाचाराच्या कारणावरून स्वतःच्या विरोधात कारवाई करण्याची प्रामाणिकता, धैर्य आणि प्रामाणिकपणा असल्याचे राघव चढ्ढा यांनी ट्विट करत म्हटले आहे. तर, अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात भ्रष्टाचार करण्याचा विचार केला तरी, तो वाचत नाही असे ट्वीट मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com