BBC IT Survey : "बीबीसीनंतर हिंडेनबर्गवर ईडीचा छापा टाका" ; कोणी लगावला केंद्र सरकारला टोला?

BBC IT Survey
BBC IT Survey

हैदराबाद : तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (BRS) मंगळवारी दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयांच्या आयकर विभागाच्या सर्वेक्षणावरून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारवर हल्ला चढवला. आयटी आणि सीबीआयसारख्या संस्था भाजपची सर्वात मोठी बाहुली बनली आहे, असा आरोप देखील केला आहे.

तेलंगणाचे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामाराव यांनी ट्विट केले, "मोठे आश्चर्य!! मोदींवरील माहितीपट प्रसारित केल्यानंतर काही आठवड्यांनंतर बीबीसी इंडियाच्या कार्यालयांवर आयटीच्या छापे पडले. आयटी, सीबीआय आणि ईडी सारख्या एजन्सी भाजपच्या सर्वात मोठ्या बाहुल्या बनल्या आहेत. पुढे काय? हिंडेनबर्गवर ईडीचा छापा की विरोधी ताब्यात घेण्याचा प्रयत्न?"

BBC IT Survey
BBC Survey : भारतातील बीबीसी कार्यालयांच्या सर्व्हेवर ब्रिटन सरकारची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय वाचा?

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) या जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थेच्या भारतातील कार्यालयांचं इन्कम टॅक्स विभागाकडून कर सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. यावरुन उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत.

BBC IT Survey
BBC IT Survey: बीबीसी कार्यालयातील आयकर विभागाच्या सर्वेक्षणावर एडिटर्स गिल्डचं मोठं विधान; म्हटलं...

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद -

काही दिवसांपूर्वी बीबीसी या प्रसारण संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक डॉक्युमेंट्री युट्यूबवर रिलीज केली होती. यानंतर भारत सरकारनं ती तातडीनं हटवली होती. या डॉक्युमेंट्रीतून बीबीसीनं भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या या कृतीवर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली होती.

BBC IT Survey
Narendra Modi : पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने असं केलं; 'या' राज्याच्या CM ची मोदींवर टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com