घुसखोरीच्या प्रयत्नातील एक दहशतवादी ठार

पीटीआय
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले आहे. त्याच्याकडून एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

नियंत्रण रेषेजवळ आज (मंगळवार) पहाटे राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्‍टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तीस मिनिटांपर्यंत चकमक झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानंतर जवानांनी राबविलेल्या शोधमोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला असून त्याच्याकडे एके-47 रायफलसह अन्य काही शस्त्रास्त्रे आणि सुकामेवा, ज्यूस आदी बाबी सापडल्या आहेत. 'दहशतवाद्यांकडून डोंगराळ पृष्ठभागाचा फायदा घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. सतर्क जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे', अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Web Title: BSF foils infiltration bid, militant killed