'आयएसआय'साठी हेरगिरी करणारा जवान अटकेत

BSF Jawan arrested for ISI Espionage
BSF Jawan arrested for ISI Espionage

नवी दिल्ली : पाकिस्तानची 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' एजन्सीसाठी (आयएसआय) हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (बीएसएफ) अटक करण्यात आली. शेख रियाजउद्दीन असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. रियाजउद्दीन मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

रियाजउद्दीन हा पंजाबच्या फिरोजपूरमधील ममदोट पोलिस ठाण्यामध्ये बीएसएफच्या 29 व्या बटालियनमध्ये ऑपरेटरचे काम करत आहे. त्याच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार लेखी स्वरुपात मिळाल्यानंतर रियाजुद्दीन याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाइल आणि सात सिमकार्ड्सही जप्त करण्यात आले आहेत.

''रियाजुद्दीनने सीमारेषेजवळील रस्त्यांचे व्हिडिओ आणि बीएसएफ युनिटमधील अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक पाकिस्तानातील हस्तकांसहित शेअर केले. तसेच सोशल मीडियातील फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि मोबाइलच्या माध्यमातून सूचना शेअर करत होता. याप्रकरणी रियाजउद्दीनला अटक करण्यात आली आहे'', अशी माहिती बीएसएफ उप-कमांडंट यांनी पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com