BSF जवानाची काश्मीरमध्ये आत्महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जम्मू : ताबारेषेच्या जवळील एका चौकीचे संरक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आज (रविवार) आत्महत्या केली. जम्मू-काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात ही घटना घडली. 

"पूँच जिल्ह्यात ताबारेषेजवळ तैनात करण्यात आलेल्या एका जवानाने मध्यरात्री त्याच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली," असे BSFच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

त्या जवानाला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले. काँस्टेबल प्रमोद कुमार असे त्या जवानाचे नाव असून, त्याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, पुढील करण्यात येत आहे. 
 
Web Title: BSF jawan commits suicide in Kashmir