भारत-पाक सीमेवर जोरदार गोळीबार; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला असून, अन्य चार नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. मोदींच्या दौऱयापूर्वी तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. मध्यरात्री झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला. चार सामान्य नागरिक मारले गेले असून, अन्य 12 जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱयांनी सांगितले.

'जम्मू भागात असलेल्या आर. एस. पुरा, बिश्ना व अर्निया सेक्टरमध्ये रात्री एक वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. भारतीय जवानही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान सीताराम उपाध्याय (वय 28) हे रात्री दीडच्या सुमारास जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जम्मूमधील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,' अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

Web Title: BSF jawan, four civilians killed in Pakistan shelling in Jammu