कुपवाडा: लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 1 जवान जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. 

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात बीएसएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोलीबारात एक जवान गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

बीएसएफच्या जवानांचा ताफा वडीपोरा गावाहून पुढच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. हेड कॉन्स्टेबल सतिंदर सिंह असे जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. हंदवाडा परिसरात सुरक्षा रक्षकांवर गेल्या 36 तासांमधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशनवर जोरदार गोळीबार केला. पोलिसांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

Web Title: BSF jawan injured as militants ambush convoy in Kashmir’s Kupwara district