बांगलादेशच्या गोळीबारात 'बीएसएफ' जवान हुतात्मा

पीटीआय
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवेर ध्वजबैठकीदरम्यान बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. 'बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश'च्या (बीजीबी) सैनिकांनी हा गोळीबार केला. 

'बीएसएफ'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तीन भारतीय मच्छिमार येथील पद्मा नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी बांगलादेशी सैन्याने त्यांना पकडले. यापैकी दोन मच्छिमारांना सोडून देण्यात आले. हे दोन मच्छिमार काकमरिचार येथील भारतीय लष्कराच्या चौकीवर आले. आणखी एका मच्छिमाराला सोडण्यासाठी बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशकडून (बीजीबी) आणि "बीएसएफ'च्या जवानांना ध्वजबैठकीसाठी पाचारण करण्यात आले. त्यानुसार, "बीएसएफ'चे पोस्ट कमांडर पाच जवानांसह बोटीत बसून पद्मा नदीतील बांगलादेशी सीमेनजीक गेले. यावेळी दोन्ही देशांत बैठकही पार पडली. मात्र, "बीजीबी'ने भारतीय मच्छिमाराला सोडण्यास नकार दिला.

तसेच "बीएसएफ'च्या जवानांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ते पाहिल्यानंतर जवान बोट घेऊन माघारी फिरले. त्यावेळी "बीजीबी'च्या सय्यद नावाच्या सैनिकाने पाठिमागून गोळीबार केला. यावेळी हेड कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांच्या डोक्‍यात गोळी लागली, तर बोट चालवणाऱ्या आणखी एका कॉन्स्टेबलच्या हातावर गोळी लागली. या दोघांनाही तातडीने मुर्शिदाबादच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांना मृत घोषित करण्यात आले. 

या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. "बीएसएफ'चे प्रमुख व्ही. के. जोहरी यांनी "बीजीबी'चे प्रमुख मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याबरोबर हॉटलाइनवर चर्चा केली. "बीजीबी'च्या महासंचलकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSF Jawan Killed Another Injured in Firing by Bangladesh Troops