BSF जवान तेज बहादूर अटकेत नाही- गृह मंत्रालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान तेज बहादूर यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र त्यांना दुसऱ्या बटालियनमध्ये हलविण्यात आले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. 

नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान तेज बहादूर यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र त्यांना दुसऱ्या बटालियनमध्ये हलविण्यात आले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. 

सैनिकांना हलक्या दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याबद्दल तेज बहादूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. तो चर्चेचा विषय बनला होता. 
बेकायदेशीर तुरुंगात ठेवण्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या नागरी हक्कानुसार तेज बहादूर यांच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात आली. यावेळी गृह मंत्रालयाने तेज बहादूर यांच्यासंदर्भात उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीत वरील स्पष्टीकरण दिले. 

काश्मीरमधील सांबा येथे BSF जवान तेज बहादूर यांची पत्नी त्यांना भेटू शकणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. या वीकेंडला म्हणजेच शनिवारी, रविवारी त्या सांबा येथे तेज बहादूर यांना भेटण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. 
 

Web Title: bsf jawan tej bahuddur not arrested, but shifted, says mha