सीमेवरील जवान हेच खरे हिरो- अक्षयकुमार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

श्रीनगर- सीमेवर लढणारे जवान हेच खरे हिरो आहेत. मी, अनेकदा सांगतो की मी पडद्यावरील हिरो असून, जवान हेच खरे हिरो आहेत, असे अभिनेता अक्षयकुमारने आज (मंगळवार) म्हटले आहे.

श्रीनगर- सीमेवर लढणारे जवान हेच खरे हिरो आहेत. मी, अनेकदा सांगतो की मी पडद्यावरील हिरो असून, जवान हेच खरे हिरो आहेत, असे अभिनेता अक्षयकुमारने आज (मंगळवार) म्हटले आहे.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाले आहेत. कृतज्ञतेबरोबरच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अक्षयकुमार जम्मूत आज (मंगळवार) दाखल झाला आहे. यावेळी त्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पला भेट दिली. यावेळी त्याने हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून जवानांबरोबर संवाद साधला. देशात अऩेक नागरिक आहेत की ज्यांना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत करायची आहे. यामुळे आपण ऍप बनवूया, असे आवाहनही त्याने केले. मात्र, यामध्ये कोणतेही राजकारण नसून केवळ जवानांच्या प्रेमापोटी आपण हे बोलत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, अक्षयकुमारने 'सैनिक', 'बेबी', 'हॉलिडे' या चित्रपटांमधून सैनिकाची भूमिका साकारली आहे. शिवाय, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पिंप्री बुटी हे गाव तो दत्तक घेणार आहे.

Web Title: bsf jawans are real heroes- akshay kumar