Republic Day : अटारी-वाघा सीमेवर भारत-पाक सैनिकांकडून मिठाईचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
Indian Army
Indian Army

अमृतसर : भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक (India Celebrate 73rd Republic Day ) दिनाचे औचित्य साधत सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पाकिस्तानी लष्कराने (Pakistan Army) अटारी-वाघा सीमेवर (JCP Attari Border) एकमेकांना मिठाई आणि शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी आज सकाळी नवी दिल्ली येथे नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक (NWM) येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. (BSF & Pakistan Rangers Exchange Sweets At JCP Attari Border)

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense ) 26 जानेवारी रोजी राजपथवरील (Raj Path) मुख्य परेड आणि 29 जानेवारी रोजी विजय चौक येथे 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यादरम्यान नवीन कार्यक्रमांची घोषणा केली आहे. तसेच येथून पुढे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day Celebration ) सोहळा 23 ते 30 जानेवारी असा आठवडाभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी, 23 जानेवारी रोजी, महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून या उत्सवाला सुरूवात करण्यात आली आहे.

Indian Army
स्वातंत्र्यानंतर सर्वात चर्चेत राहिलेला अर्थसंकल्प; संबोधले होते 'ड्रीम बजेट', वाचा का?

PM मोदींच्या लूकची चर्चा; निवडणूक असलेल्या दोन राज्यांशी संबंध

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी नवा लूक बघायला मिळाला. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) पेहराव हासुद्धा चर्चेत असतो. यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी आणि गळ्यात घातलेला टॉवेल दोन राज्यांची खास अशी ओळख आहे. मोदींनी घातलेली टोपी उत्तराखंडची (Uttarakhand) आणि टॉवेल मणिपूरचा (Manipur) आहे.

Indian Army
Republic Day : Google 'डूडल' च्या देशवासियांना खास पद्धतीने शुभेच्छा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवरून मोदींनी टोपी घातल्याबद्दल त्यांचं आभार मानलं आहे. तसंच प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडची टोपी घालून राज्याची संस्कृती आणि परंपरेचा गौरव केल्याचंही म्हटलं आहे. उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुढच्या महिन्यात निवडणुका आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पेहरावामागे दोन्ही राज्यांसाठी खास संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com