बीएसएनएलचा 149 रुपयांचा प्लान

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना लवकरच 149 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉलचा आनंद घेता येणार आहे. नवीन मासिक टॅरिफ प्लान नव्या वर्षाच्या सुरवातीला सुरू केला जाणार आहे.

या योजनेमुळे बीएसएनएल जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. बीएसएनएलच्या 149 रुपयांच्या ऑफरमध्ये अनलिमिटेड कॉलसह 300 एमबी डेटाही उपलब्ध होणार असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. "जिओ'ची वेलकम ऑफर 5 सप्टेंबर 2016ला सुरू झाली असून, नवीन घोषणेनुसार ती 31 मार्च 2017 पर्यंत सुरू राहणार आहे. "जिओ'ने टेलिकॉम कंपन्यांपुढे आव्हान उभे केले असून, याचा अनेक कंपन्यांना फटका बसला आहे.

Web Title: bsnl plan 145