BSP Leader Got MBA Exam Paper Leaked To Help Girlfriend
BSP Leader Got MBA Exam Paper Leaked To Help Girlfriend

प्रेमासाठी वाट्टेल ते; नेता कारागृहात तर प्रेयसी फरार

अलीगढः प्रेमासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. एका नेत्याने त्याच्या प्रेयसीसाठी एमबीएचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. प्रियकराला अटक झाल्याचे समजताच प्रेयसी फरार झाली.

उत्तर प्रदेश पोलिसांनी बहुजन समाज पक्षाच्या फरोज आलम उर्फ राजा या नेत्याला अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याच्या सहाय्याने एमबीएचा पेपर लीक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फरोज आलम याची प्रेयसी विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होती. पेपर लीक करण्यासाठी आपण विद्यापीठातील कर्मचारी इरशाद याची मदत घेतल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले आहे. मोबदला म्हणून विद्यापीठात कायमची नोकरी देण्याचे आश्वासन त्याने दिले होते.

आलमने सांगितले की, 'प्रेयसीला परीक्षेचा पेपर आणून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, खरी प्रश्नपत्रिका न मिळाल्याने दुसरी प्रश्नपत्रिका दिली. तिच्या हे लक्षात आले. यामुळे नाराज होऊन तिने बोलणे बंद केले. यानंतर आलम आणि त्याचा मित्र हैदर यांनी इरशादला पेपर लीक करण्यासाठी तयार केले.'

वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश यांनी सांगितले की, 'संशयीत आरोपी ज्या ठिकाणी भेटायचे तो फ्लॅट जप्त केला आहे. हा फ्लॅट हैदरचे काका तहसीम सिद्दीकी यांचा आहे. सिद्दीकी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहे. ही टोळी दोन हजार रुपयांत प्रश्नपत्रिका विकत होती. यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com