बसप आता 'बहेनजी संपत्ती पार्टी' - मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी 100 कोटी रुपये खात्यावर भरल्याने त्या आता नोटबंदीवर चर्चा करत नाहीत. कोट्यवधींची माया असणारे नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांचे विरोधक असलेले समाजवादी पक्ष आणि बसप एकच भाषा बोलू लागले.

ओराई - बसप हा आता आणखी काही काळ बहुजन समाज पक्ष राहू शकत नाही. बहुजन हा फक्त मायावतींपुरता मर्यादीत राहिला असून, आता तो बहेनजी संपत्ती पार्टी असा झाल्याची, टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

बुंदेलखंडमधील ओराई येथे प्रचारसभेत बोलताना मोदींनी मायवतींवर जोरदार टीका केली. नोटबंदीच्या निर्णयानंतर मायावतींच्या भावाच्या खात्यावर 100 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे मोदींनी मायवतींना लक्ष्य केले. नोटबंदीच्या निर्णयावर मायावतींकडून मोदींना अनेकवेळा लक्ष्य करण्यात आले आहे.

मोदी म्हणाले, की नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी 100 कोटी रुपये खात्यावर भरल्याने त्या आता नोटबंदीवर चर्चा करत नाहीत. कोट्यवधींची माया असणारे नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांचे विरोधक असलेले समाजवादी पक्ष आणि बसप एकच भाषा बोलू लागले. त्यांच्या या सुरात काँग्रेसनेही सुर मिळवत नोटबंदीच्या निर्णयावर टीका करण्यात आली. या पक्षांची मुख्य अडचण अशी आहे, की त्यांना चुकीच्या पद्धतीने मिळविलेला पैसा लपविण्यात वेळ मिळाला नाही.

Web Title: BSP is now Behenji Sampatti Party: PM Modi