उत्तर प्रदेशसाठी बसपची दुसरी यादी प्रसिद्ध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पक्षाच्या वतीने यंदा 97 मुस्लिम समाजाचे उमेदवार, 106 मागासवर्गीय जातीतील उमेदवार, 87 दलित समाजातील उमेदवार तर 113 उच्च जातीतील उमेदवार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी त्यांनी 100 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. आहे. आज पुन्हा 100 उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 27 उमेदवार हे अनुसूचित जातीचे आहेत. तर मुस्लिम समाजाच्या एकूण 36 उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामध्ये मुझफ्फरनगरमधील दंगलीतील आरोपी आणि विद्यमान आमदार नूर सलीम राणा यांच्या नावाचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी देशातील पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे.

Web Title: BSP releases second list of 100 candidates for UP polls