मोदीजी, स्वत:च्या भ्रष्टाचारांकडे बघा : समाजवादी पक्ष

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना बहुजन समाज पक्षाने मोदी यांनी स्वत:च्या पक्षाच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गैरव्यवहारांकडे बघावे, असा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना बहुजन समाज पक्षाने मोदी यांनी स्वत:च्या पक्षाच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गैरव्यवहारांकडे बघावे, असा सल्ला दिला आहे.

मेरठ येथील एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी, 'उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक समृद्ध राज्य होण्याची क्षमता असून राज्यातून SCAM ला (S : समाजवादी पक्ष C : कॉंग्रेस A : अखिलेश यादव M : मायावती) सत्तेतून हटवा' असे आवाहन केले. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भदोरिया म्हणाले, 'मोदीजींच्या स्वत:च्या पक्षाने आणि सरकारने अनेक गैरव्यवहार केले आहेत. त्यामध्ये विजय मल्ल्या भ्रष्टाचार, ललित मोदी भ्रष्टाचार, व्यापक गैरव्यवहार असे 50 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचे अनेक गैरव्यवहार आहेत. मोदी आणि त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या अनेक गैरव्यवहारांमध्ये अडकलेले असताना मोदी ओढून ताणून इतरांवर टीका करत आहेत.' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वाईट अनुभवामुळे आणि पंतप्रधानांच्या खोट्या आश्‍वासनामुळे उत्तर प्रदेशमधील जनता बहुजन समाज पक्षालाच निवडून देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. 11 फेब्रुवारीपासून सुरू होणारी मतदान प्रक्रिया 8 मार्चपर्यंत चालणार आहे.

Web Title: BSP slams PM Modi's remark, says take a peep into your own 'scams'