विरोधात बसू, पण भाजपला साथ नाहीच- मायावती

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (बसप) बहुमत मिळवेल. पण, बहुमतासाठी संख्या कमी पडल्यास भाजपची मदत कधीच घेणार नाही, असे बसपच्या प्रमुख मायवती यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) कानपूर येथे मायावती यांची सभा झाली. या सभेमध्ये मायवती यांनी भाजपसोबत बसप सरकार स्थापन असल्याचे वृत्ताचे खंडन करत असे कधीच होणार नाही, असे म्हटले आहे.

मायावती म्हणाल्या, भाजपकडून सोशल मिडीयामध्ये बसपसोबत सरकार स्थापन करत असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. पण, असे कधीच होऊ शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे, की बसपला उत्तर प्रदेशात बहुमत मिळेल. त्यामुळे भाजप किंवा समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बहुमत न मिळाल्यास आम्ही विरोधात बसू, पण भाजपला पाठिंबा देणार नाही. बसपच नंबर एकचा पक्ष राहिल. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडाली आहे.

Web Title: BSP will never form government with BJP's help: Mayawati