हवाई चप्पल घालणारेही आता विमानाने जाऊ शकतील..! : जेटली 

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : 'पायात हवाई चप्पल घालणारेही आता विमान प्रवास करू शकतात' अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये देशातील हवाई क्षेत्रातील वाढत्या उलाढालीची दखल घेतली. यंदाच्या अर्थसंकल्पात जेटली यांनी देशातील विमानतळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. 

छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी केंद्र सरकारने 'उडान' ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. 'उडे देश का आम नागरिक' याचे 'उडान' हे संक्षिप्त रुप आहे. 'देशातील विमानतळांची क्षमता पाच पटीने वाढविण्याची सरकारची योजना आहे. यातून दर वर्षी शंभर कोटी उड्डाणे होतील, असा अंदाज आहे', असे जेटली यांनी लोकसभेत केलेल्या भाषणामध्ये नमूद केले. Image may contain: airplane

देशातील विमानतळ प्राधिकरणाकडे सध्या 124 विमानतळ आहेत. ही संख्या वाढविण्याची केंद्र सरकारची योजना आहे. 'सध्या वापरात नसलेले 56 विमानतळे आणि वापरात नसलेल्या 31 हेलिपॅड्‌स वापरात आणण्याची योजना आहे. यापैकी 16 विमानतळांवर काम सुरू झाले आहे', असे जेटली म्हणाले.

मोबाईल फोन महागले; पण स्वस्त काय झाले? 

महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'! 

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018

बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! #Budget2018

अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस

देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?

5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली

#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र

2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Air Travel in India UDAAN Scheme