अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यापासून शेतीसाठी अधिक तरतुदीपर्यंतच्या घोषणा जेटली यांनी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

अर्थसंकल्पातील दुपारी 12.00 पर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यापासून शेतीसाठी अधिक तरतुदीपर्यंतच्या घोषणा जेटली यांनी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

अर्थसंकल्पातील दुपारी 12.00 पर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे

 • अनुसुचित जातीच्या विकासाठी 56 हजार कोटींची तरतूद
 • गंगाकाठी शौचालये उभारून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न
 • नमामी गंगेअंतर्गत आयोजित 187 प्रकल्पांपैकी 47 योजना पूर्ण
 • गंगा स्वच्छतेसाठी 1080 प्रकल्प सुरु करणार
 • मुद्रा योजनेतून 3 लाख कोटींचे कर्ज वाटण्याचे उद्दीष्ट
 • नोटाबंदीनंतर उद्योगांचे नुकसान भरून काढण्यासाठी 3700 कोटींची तरतूद
 • नव्या कर्मचाऱ्यांना सरकार ईपीएफमध्ये 12 टक्के रक्कम देणार
 • गेल्या वर्षी 70 लाख नव्या रोजगारांची निर्मिती
 • लघु उद्योगांसाठी 3794 कोटींची तरतूद
 • टेक्सटाईल्सच्या विकासासाठी 7140 कोटींची तरतूद
 • कापड उद्योगासाठी 7100 कोटींची तरतूद
 • स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नव्या 99 शहरांची निवड करण्यात येणार
 • धर्मिक शहरांसाठी हेरिटेज सिटी योजना राबविणार, पर्यटन विकासाचे उद्दीष्ट
 • अमृत योजनेंतर्गत 500 शहरांना शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्दीष्ट

शेतीसाठी Image may contain: one or more people, child and outdoor

 • नाशवंत पदार्थांवरील प्रक्रियेसाठी 500 कोटींची तरतूद
 • ऑपरेशन ग्रीनसाठी 500 कोटींची तरतूद
 • किसान क्रेडीट कार्डच्या क्षमता वाढविण्यात येणार
 • राष्ट्रीय बांबू मिशन राबविण्यात येणार, त्यासाठी 290 कोटींची तरतूद
 • नाबार्डच्या माध्यमातून सुक्ष्म सिंचन राबविण्यात येणार असून, त्याच्या कक्षा रुंदावणार
 • 100 बिलियन डॉलरचा शेतमाल निर्यात केला जातो, त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार
 • मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी 10 कोटी खर्च करणार
 • 470 बाजार समित्या इंटरनेटने जोडण्यात येणार
 • 2600 कोटी कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यांना देण्यात येणार

सर्वसामान्यांसाठी

 • उज्वला योजनेंतर्गत आठ कोटी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात येणार
 • आतापर्यंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण
 • स्वच्छ भारत अभियानांतर्गत 6 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली
 • येत्या वर्षात 2 कोटी शौचालये उभारण्यात येणार
 • प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत 4 कोटी घरांमध्ये मोफत वीज कनेक्शन
 • वीज कनेक्शनसाठी 1600 कोटींची तरतूद
 • 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज कनेक्शन देणार
 • गेल्यावर्षी 51 लाख घरे बांधण्यात आली
 • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर बांधून देण्यात येणार
 • 51 लाख घरे बांधणार येणार, त्यातली 36 लाख घरे शहरात 
 • 14.53 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, जेणेकरुन रोजगार निर्मितीला चालना मिळेल

शिक्षण

 • शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षक देऊ
 • आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार
 • प्री नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे धोरण एकच राहिल याची काळजी घेणार
 • डिजीटल शिक्षणावर भर देण्याचा सरकारचा निर्णय
 • 1 लाख कोटींची शिक्षणासाठी तरतूद

आरोग्य

 • राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना सुरु करण्यात येणार
 • या योजनेसाठी 1200 कोटींची तरतूद
 • 10 कोटी कुटुंबासाठी दरवर्षी 5 लाख रुपयांची मदत करणार
 • याचा फायदा 50 कोटी नागरिकांना होणार
 • आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी आयुषमान भारत कार्यक्रम राबविण्यात येणार
 • देशातील 40 टक्के नागरिकांना विमा योजनेचा फायदा
 • 24 नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार, दर 3 लोकसभा मतदारसंघामागे एक मोठे रुग्णालय
 • टीबी रोखण्यासाठी 600 कोटींची तरतूद
 • 470 एपीएमसी इंटरनेटने जोडण्यात आल्या
 • शेतीचा विकास क्लस्टर प्रमाणे करण्याची गरज
 • महिला बचत गटाकडून शेतीचे मार्केटींग करण्यात येणार
 • कृषी आणि वाणिज्य मंत्रालयाकडून एकत्र प्रयत्न करण्यात येणार
 • टोमॅटो आणि बटाटे यांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन सरकारपुढील आव्हान
 • मनेरगा आणि इतर योजनांतर्गत पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर
 • अन्न प्रक्रियेसाठी 1400 कोटींची तरतूद
 • नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे
 • जगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर
 • सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी
 • भारताची अर्थव्यवस्था 2.3 ट्रिलियन
 • जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करप्रणाली सोपी
 • गरिब, मध्यमवर्गासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न
 • ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी सरकारचा प्रयत्न
 • मोदींच्या नेतृत्वामुळे व्यवसायपूरक देशांच्या मानांकनात भारताची वाढ
 • एका दिवसांत कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण
 • सेवा क्षेत्रासह उत्पादन क्षेत्रातही वाढ
 • 4 कोटी घरांपर्यंत वीज पोचविण्याचे काम सुरु
 • तिकीटांसह सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळत असल्याने डिजीटल इंडियाकडे कल 
 • गरिब जनतेसाठी आरोग्य सुविधा कमीदरात उपलब्ध
 • 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट
 • शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध
 • शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा सरकारचे प्रयत्न
 • केंद्र आणि निती आयोग शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळण्यासाठी प्रय़त्न करेल
 • सध्या देशातील शेतीतील उत्पादन रेकॉर्ड ब्रेक आहे
 • फळांचे 3 लाख कोटींचे उत्पादन, 27.5 मिलियन टन अन्नधाऩ्याचे उत्पादन
 • बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे रेल्वे विद्यापाठ सुरु करणार
 • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरु
 • विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढविण्यात येणार
 • नव्याने 900 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करणार
 • सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उडान योजनेला भर
 • विमानतळांची संख्या वाढली तर सुविधा पुरविण्यावर भर
Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley BJP Lok Sabha 2019