शेतीवर दिसतोय सरकारचा भर : सकाळी ११.३० वाजता

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करत आहेत. लोकप्रियतेकडे झुकलेला, सुधारणावादी व धाडसी की समन्वय साधणारा समतोल अर्थसंकल्प असेल, याबाबत अटकळबाजी सुरू आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करत आहेत. लोकप्रियतेकडे झुकलेला, सुधारणावादी व धाडसी की समन्वय साधणारा समतोल अर्थसंकल्प असेल, याबाबत अटकळबाजी सुरू आहे.

रोजगारनिर्मिती, शेतीच्या क्षेत्रातील दुरवस्था, खासगी गुंतवणुकीतील शिथिलता ही त्यांच्यापुढील प्रमुख आव्हानक्षेत्रे आहेत; तसेच वर्तमान राजवटीचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने व निवडणुकांची चर्चा आतापासूनच सुरू झाल्याने मतदारांना दिलासा देण्यासाठी ते काय करतात, याचीच चर्चा आहे. FM Arun Jaitlye before presenting Union Budget 2018-2019

जेटली यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

 • भाजपचे सरकार सत्तेत आले, तेव्हा धोरणात्मक लकव्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उतरणीस लागली होती. 
 • एकेकाळी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला होता 
 • 'जीएसटी'मुळे किचकट करप्रणाली सोपी झाली आहे. 
 • जगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर; भारत लवकरच जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 
 • भारताच्या विकास दर 7.4% असेल, असा अंदाज आंतराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. 
 • नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे
 • सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी
 • भारताची अर्थव्यवस्था 2.3 ट्रिलियन
 • गरिब, मध्यमवर्गासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न
 • ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी सरकारचा प्रयत्न
 • मोदींच्या नेतृत्वामुळे व्यवसायपूरक देशांच्या मानांकनात भारताची वाढ
 • एका दिवसांत कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण
 • सेवा क्षेत्रासह उत्पादन क्षेत्रातही वाढ
 • 4 कोटी घरांपर्यंत वीज पोचविण्याचे काम सुरु
 • तिकीटांसह सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळत असल्याने डिजीटल इंडियाकडे कल 
 • गरिब जनतेसाठी आरोग्य सुविधा कमीदरात उपलब्ध
 • 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट
 • शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध
 • शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा सरकारचे प्रयत्न
 • केंद्र आणि निती आयोग शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळण्यासाठी प्रय़त्न करेल
 • सध्या देशातील शेतीतील उत्पादन रेकॉर्ड ब्रेक आहे
 • फळांचे 3 लाख कोटींचे उत्पादन, 27.5 मिलियन टन अन्नधाऩ्याचे उत्पादन
 • मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी 10 कोटी खर्च करणार
 • 470 बाजार समित्या इंटरनेटने जोडण्यात येणार
 • 2600 कोटी कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यांना देण्यात येणार
 • उज्वला योजनेंतर्गत आठ कोटी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात येणार
 • आतापर्यंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण
 • स्वच्छ भारत अभियानांतर्गत 6 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली
 • येत्या वर्षात 2 कोटी शौचालये उभारण्यात येणार
 • प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत 4 कोटी घरांमध्ये मोफत वीज कनेक्शन
 • वीज कनेक्शनसाठी 1600 कोटींची तरतूद
 • 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज कनेक्शन देणार
 • गेल्यावर्षी 51 लाख घरे बांधण्यात आली
 • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर बांधून देण्यात येणार
 • 51 लाख घरे बांधणार येणार, त्यातली 36 लाख घरे शहरात
 • 14.53 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, जेणेकरुन रोजगार निर्मितीला चालना मिळेल
 • शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षक देऊ
 • आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार
 • प्री नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे धोरण एकच राहिल याची काळजी घेणार
 • डिजीटल शिक्षणावर भर देण्याचा सरकारचा निर्णय
 • 1 लाख कोटींची शिक्षणासाठी तरतूद
Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Narendra Modi BJP Lok Sabha 2019