#Budget2018 'ई सकाळ' विशेष बुलेटिन

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

केंद्रिय अर्थसंकल्प 2018 संबंधित 'ई सकाळ' वरील महत्त्वाच्या बातम्या :

#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! 
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले. 

#Budget2018 गंगा स्वच्छतेसाठी 1080 प्रकल्प सुरु करणार : अरुण जेटली
आत्तापर्यंत 187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 47 योजना पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.

#Budget2018 'इज ऑफ लिव्हिंग'वर भर देणारा अर्थसंकल्प: नरेंद्र मोदी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा भारताचा पाया अधिक भक्‍कम करणारा असल्याचे प्रशस्तिपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दिले.

#Budget2018  महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'! 
'इन्कम टॅक्‍समध्ये काय बदल झाला' हा केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्‍न! तर.. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकराच्या मर्यादेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

#Budget2018 मोबाईल फोन महागले; पण स्वस्त काय झाले? 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 'सेस' वाढविल्यामुळे जवळपास प्रत्येक बिल महागणार आहे. मोबाईल फोनवरील सीमा शुल्क वाढविल्यामुळे आता स्मार्टफोनही महागणार आहेत. 

#Budget2018 अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प हा नवभारताच्या निर्मितीकडे जाणारा आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

#Budget2018 जेटली उवाच....रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेमध्ये अर्थसंकल्प मांदला. यावेळी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांचे जाळे अधिकाधिक विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. 

#Budget2018 जेटली उवाच....संरक्षण क्षेत्र
भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.  

#Budget2018 Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला
रूण जेटली अर्थसंकल्प सादर करत असताना उसळलेला शेअर बाजार भांडवली उत्पन्नावर कराची घोषणा होताच धाड्कन कोसळला आहे. 

#Budget2018 : जेटली उवाच ....कृषी क्षेत्र
देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

#Budget2018 : देशातील मध्यमवर्ग आता जोमाने 'उडणार' 
 देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढ होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमानतळांच्या सक्षमीकरणावर आणि विमान वाहतुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

#Budget2018 देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?
अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करताना देशभरातील जनतेच्या आरोग्याचा विचार प्राधान्यायाने केला आहे. परंतु, खरोखरच या आरोग्य विमाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल का? हा खरा प्रश्न आहे.

#Budget2018 : 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली
देशातील नागरिकांसाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. 'प्रधानमंत्री उज्ज्वला' योजनेंतर्गत आत्तापर्यंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

#Budget2018 : 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली
देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

#Budget2018 : राष्ट्रपती, खासदारांचे वेतन वाढणार; नागरिकांचे काय?
अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प सादर करताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व खासदारांच्या वेतनामध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले.

#Budget2018 : नर्सरी ते बारावी शिक्षणाचे एकच धोरण
शिक्षणाचा दर्जा आजही चिंतेची बाब असून हा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 

#Budget2018 : अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. 

#Budget2018 : अर्थसंकल्प प्रथमच हिंदीतून
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला आज (गुरूवार) केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 'देसी' टच दिला. अर्थमंत्र्यांनी आतापर्यंतची परंपरा मोडून हिंदीतून अर्थसंकल्पाचे भाषण केले. 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley narendra modi sensex