#Budget2018 नर्सरी ते बारावी शिक्षणाचे एकच धोरण

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

शिक्षणाचा दर्जा आजही चिंतेची बाब असून हा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - शिक्षणाचा दर्जा आजही चिंतेची बाब असून हा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 

जेटली यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
- शिक्षणासाठी 1 लाख कोटींची तरतूद
- शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची
- शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षक देणार
- आदिवासी मुलांसाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार
- प्री नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे धोरण एकच राहिल याची काळजी घेणार
- शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार, डिजीटल शिक्षणावर भर देणार
- 'प्रधानमंत्री फेलोशिप' योजनेतून 1000 B.Tech विद्यार्थ्यांची निवड होणार

अर्थसंकल्पाच्या इतर महत्त्वाच्या बातम्या :

शेतीवर दिसतोय सरकारचा भर : सकाळी ११.३० वाजता

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

अर्थसंकल्प प्रथमच हिंदीतून

Web Title: Budget 2018 Union Budget Education Arun Jaitley Narendra Modi BJP Lok Sabha 2019