शेतकरी, गरीबांसाठी अपुरा अर्थसंकल्पः एचडी देवेगौडा

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी अर्थसंकल्पातील शेतकऱयांसाठीच्या तरतुदी पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. 'अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी काही प्रयत्न जरूर केले आहेत. मात्र, या घटकांसमोरील प्रश्न फार मोठे आहेत आणि केलेल्या तरतुदी पुरेशा नाहीत,' असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांसाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा एकदा बजेटमध्ये मांडले आहे.

#Budget2018: सर्व कव्हरेज एकाच ठिकाणी

फळांचे 3 लाख कोटींचे उत्पादन, २.५ कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन होत आहे, शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल. गरिब जनतेसाठी आरोग्य सुविधा कमीदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जेटली यांनी भाषणात सांगितले आहे.

Web Title: budget 2018 union budget HD Dewe Gowda arun jaitley