Budget 2019 : अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी 

Piyush Goyal
Piyush Goyal

रेल्वे 
- अर्थसंकल्पात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 64,587 कोटी रुपयांची तरतूद 
- एकूण सर्वसाधारण भांडवली खर्चाची तरतूद 1,58,658 कोटी रुपये 
- ऑपरेटिंग रेशो : 2017-18 च्या 98.4 टक्‍क्‍यांपेक्षा सुधारणा अपेक्षित. 2018-19 मध्ये (आरई) 96.2 टक्के तर 2019-20 मध्ये (बीई) 95 टक्के 

मनोरंजन क्षेत्र 
- भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक खिडकी योजना. एकाच ठिकाणी मिळणार सर्व परवानग्या. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रोत्साहन. 
- चित्रपटासाठीच्या नियमावलीमध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्रावर भर. 
- पायरेसीवर नियंत्रण आणण्यासाठी सिनेमॅटोग्राफ ऍक्‍टमध्ये सुधारणा करणार. 

छोटे, लघू आणि मध्यम उद्योग आणि व्यापारी 
- जीएसटीअतंर्गत नोंदणी केलेल्या छोट्या, लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंतच्या वाढीव कर्जावर 2 टक्के अनुदानाची तरतूद. 
- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी 25 टक्के पुरवठ्यातील किमान 3 टक्के मालाचा पुरवठा महिलांच्या मालकीच्या छोट्या, लघू आणि मध्यम उद्योगाकडून घेतला जाणार. 
- देशांतर्गत व्यापारावर विशेष लक्ष; डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशनचे नाव बदलून प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटर्नल ट्रेड असे करण्यात आले आहे. 

डिजिटल व्हिलेजेस (गावे) 
- केंद्र सरकार पुढील पाच वर्षांत 1 लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांमध्ये करणार. 

इतर घोषणा 
- राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी नवे राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता पोर्टल सुरू करणार. 

2014 ते 2019 दरम्यान सरकारचे यश 
- अर्थव्यवस्थेतील सुधार. 
- मागील पाच वर्षांत भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित. 
- भारतीय अर्थव्यवस्था 2014 ते 2019 दरम्यान आतापर्यंतच्या सर्वोत्तम स्थितीत असल्याचे अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन. 
- भारत 2013-14 मध्ये जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. पाच वर्षांत भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत 6 व्या क्रमांकावर झेप घेतली 
- 2014-19 या काळात जीडीपीतील वार्षिक सरासरी वाढ 1991 नंतरच्या कोणत्याही सरकारच्या तुलनेत जास्त. 
- सरकारने 2009-14 या काळात कणा मोडणाऱ्या महागाईला आटोक्‍यात आणले असल्याचे अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन. 
- डिसेंबर 2018 मध्ये महागाई दर फक्त 2.19 टक्‍क्‍यांवर. 
- सात वर्षांआधीच्या 6 टक्‍क्‍यांवरून 2018-19 मध्ये महसुली खर्चाच्या तुलनेत वित्तीय तूट 3.4 टक्‍क्‍यांवर. 
- सहा वर्षांपूर्वी असलेली 5.6 टक्‍क्‍यांची चालू खात्याची तूट या वर्षी चालू खात्याची तूट जीडीपीच्या तुलनेत 2.5 टक्‍क्‍यांवर. 
- मागील पाच वर्षांत भारतात 239 अब्ज डॉलरची भरीव परकी गुंतवणूक. 
- भारताची गाडी रुळावर आणि प्रगतीच्या, समृद्धीच्या दिशेने असल्याचे अर्थमंत्र्यांचे म्हणणे 
- भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था. 
- दोन आकडी चलनवाढ आणि वित्तीय परतफेडीचा समन्वय. 
- परकी गुंतवणूक धोरणातील उदारीकरणमुळे मोठ्या प्रमाणावर परकी गुंतवणूक देशात येण्याचे मार्ग खुले. 

शेतकरी 
- शेतकऱ्यांना 22 पिकांवर किमान 50 टक्‍क्‍यांची आधारभूत किंमत. 
- मागील पाच वर्षांत कर्जावरील व्याजावर दिले जाणारे अनुदान दुप्पट. 
- शेतीच्या प्रती संदर्भातील धोरणामुळे आणि युरियावर देण्यात येणाऱ्या कडुलिंबाच्या बाह्यथरामुळे शेतीमध्ये आमूलाग्र बदल. 

मनुष्यबळ 
- रोजगाराच्या संधींमध्ये वाढ; कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यांमध्ये 2 कोटींची भर. 
- मागील पाच वर्षांत सर्व प्रकारच्या कामगारांसाठीच्या किमान वेतनात 42 टक्‍क्‍यांची वाढ. 

गरीब आणि मागासवर्गीय 
- शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये गरिबांना 10 टक्के आरक्षण. 
- सौभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक घरासाठी मोफत वीजजोडणी. 
- 50 कोटी नागरिकांसाठी आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना. 
- 115 मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जिल्हा आकांक्षा कार्यक्रम. 
- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी 2018-19 मध्ये स्वस्त अन्नधान्यावर 1,70,000 कोटी रुपये खर्च. 
- खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून 143 कोटी एलईडी बल्बचे वितरण. 
- एलईडी बल्बमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या विजेच्या बिलात 50,000 कोटी रुपयांची बचत. 
- आयुष्मान भारत योजनेमुळे 10 लाख रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ. 
- जनऔषधी केंद्रांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात औषधांची उपलब्धता 
- देशभरातील 21 पैकी 14 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसची विद्यमान सरकारकडून घोषणा. 
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सरकारकडून रस्ते बांधणीचे काम तिपटीने वाढले. 
- देशातील 17.84 लाख वस्त्या, गावांपैकी 15.80 लाख वस्त्या आणि गावं पक्‍क्‍या रस्त्यांनी जोडण्यात आली. 
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 2018-19 मधील अर्थसंकल्पीय तरतूद 15,500 कोटी रुपये होती, ती वाढवून 19,000 कोटी रुपये करण्यात आली. 
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2014-18 दरम्यान 1.53 कोटी घरांचे बांधकाम. 

वंचित आणि असुरक्षित घटक 
- देशातील अनुसूचित जाती-जमातींच्या कक्षेबाहेर असलेल्या सर्व वंचित घटकांसाठी "निती आयोगा'अंतर्गत एका स्वतंत्र समितीची स्थापना. 

संरक्षण 
- देशाच्या इतिहासात प्रथमच संरक्षण विभागासाठीची तरतूद तीन लाख कोटी रुपयांहून अधिक. 

वित्तीय योजना 
- 2019-20 साठीच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.4 टक्के वित्तीय तूट. 
- 2020-21 पर्यंत वित्तीय तुटीचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांपर्यंत कमी आणण्याचे लक्ष्य. 
- सात वर्षांपूर्वी असलेल्या तुटीपेक्षा जवळपास सहा टक्‍क्‍यांनी वित्तीय तुटीचे प्रमाण कमी. 
- एकूण खर्चामध्ये 13 टक्‍क्‍यांची वाढ; 2019-20 साठी 27,84,200 कोटी रुपयांचा अंदाज. 
- केंद्र सरकारच्या योजनांसाठीचा निधी 3,27,679 कोटी रुपये. 
- राष्ट्रीय शिक्षण योजनेसाठीच्या निधीमध्ये 20 टक्‍क्‍यांची वाढ; एकूण तरतूद 38,572 कोटी रुपये. 
- बालविकास योजनेसाठीच्या निधीमध्ये 18 टक्‍क्‍यांची वाढ; एकूण तरतूद 27,584 कोटी रुपये. 
- अनुसूचित जातींसाठीच्या तरतुदीमध्ये 35.6 टक्‍क्‍यांनी वाढ; आता 76, 801 कोटी रुपयांची तरतूद. 
- अनुसूचित जमातींसाठीच्या तरतुदींमध्ये 28 टक्‍क्‍यांची वाढ; आता 50,086 कोटी रुपयांची तरतूद. 
- निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80 हजार कोटी रुपये इतके असेल. 

प्रत्यक्ष कर प्रस्ताव 
- वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त. 
- देशातील तीन कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदात्यांना एकूण 23 हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा दिलासा. 
- स्टॅंडर्ड डिडक्‍शन 40 हजार रुपयांहून 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. 
- बॅंक आणि पोस्टातील ठेवींवरील "टीडीएस'ची मर्यादा 10 हजार रुपयांवरून 40 हजार रुपये होईल. 
- प्राप्तिकरातील सध्याचे टप्पे कायम असतील. 
- स्वत:चे वास्तव्य असलेल्या भाड्याच्या घरासाठीची रक्कम करमुक्त. 
- भाड्याच्या घरासाठीची "टीडीएस'ची मर्यादा 1,80,000 रुपयांवरून 2,40,000 रुपये इतकी करण्यात आली आहे 
- कलम 80-आयबीएअंतर्गत सवलतींसाठी परवडणाऱ्या घरांसाठीच्या योजनेची मर्यादा 31 मार्च, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

शेतकरी- 
- राष्ट्रीय गोकूळ अभियानामध्ये 750 करोड रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. 
- गोधनाच्या टिकावू अनुवांशिक उन्नतीकरणासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. 
- मत्स्यव्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी स्वंतत्र विभागांतर्गत 1.5 करोड रुपयांची तरतूद. 
- पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच नियमतपणे आणि वेळेवर व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात 3 टक्के सवलतदिली जाणार आहे. 
- नैसर्गिक आपत्तीच्या काळात कर्जाची पुनर्बांधणी पूर्ण कालावधीत व्याजदरात दोन टक्के सवलत देण्यात आली आहे. 

गरीब आणि मागासवर्ग 
- देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम देशातील गरिबांचा अधिकार आहे - अर्थमंत्री, पीयूष गोयल 
- गरिबांसाठी असलेल्या 10 टक्के आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रांमध्ये 25 टक्के अधिक जागांची तरतूद. 
- गाव आणि शहरातील दरी कमी करण्यासाठी आणि गावातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी विशिष्ट तरतूद. 
- मार्च 2019 पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीजपुरवठा देण्यात येणार आहे. 

ईशान्य भाग 
- ईशान्य भागासाठी असलेल्या तरतुदीमध्ये 21 टक्‍क्‍यांनी वाढ. 2019-2020 मध्ये 58,166 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
- अरुणाचल प्रदेश नुकतेच विमानसेवेने जोडले गेले आहे. 
- मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या तीन राज्यांत नुकतीच रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. 
- ब्रह्मपुत्रेतून जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी विशिष्ट तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com